August 8, 2025

निवडणूक पूर्वतयारीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था बैठक संपन्न

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्ह्यात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांतेत पार पाडावे, मतदान प्रक्रीया पारदर्शक असावी याअनुषांगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा आणि सुव्यवस्था बैठक घेण्यात आली.यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक गौहर हसन, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणुक शिरीष यादव, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संतोष भोर, प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,भुसंपादन मांजरा प्रकल्प उदयसिंह भोसले, तुळजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक देशमुख तसेच महसूल, जिल्हा परिषद आणि पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
  • सार्वत्रिक निवडणूक 2024 या अनुषंगाने सर्व नोटाला अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी व विभाग अधिकाऱ्यांनी निवडणुकीत त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्या जबाबदारी विषयी माहिती घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थितपणे कामकाज करावे. पोलीस विभागाने सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच क्रिटिकल मतदान केंद्राबाबत अधिक काळजी घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
error: Content is protected !!