कळंब- शेळका धानोरा येथे श्री .संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था व नेहरू युवा मंडळ चे सचिव कमलाकर शेवाळे यांनी श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुजन केले.तसेच यावेळी श्री.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे कार्य व समाज प्रबोधन यावर प्रकाश टाकून आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी भारत शेवाळे,विठ्ठलराव शेवाळे,बब्रुवान शेवाळे,ज्ञानोबा कसबे ,गोकुळ शेवाळे , नवनाथ शेवाळे ,संतोष शेळके ,दादाराव शेवाळे ,रवी शेवाळे , बबन शेळके गजानन शेवाळे ,आण्णा शेवाळे ‘महादेव इंगळे आदीं ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी राहुल शेवाळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले