August 8, 2025

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त महिलांची स्वच्छता मोहीम

  • कळंब – कळंब येथील परीट धोबी समाज महिला संघटनेच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ( 23 फेब्रुवारी ) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त रामेश्वर महादेव मंदिर कळंब येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपस्थित महिलांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रसंगी माधवसिंग राजपूत यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले व स्वच्छतेचे तसेच समाज सुधारणे विषयीच्या कार्याचे महत्व सांगितले.उपस्थित महिलांनी मंदिर परिसराची तसेच राष्ट्रसंत संत गाडगे महाराज चौक परिसराची स्वच्छता केली.या स्वच्छता मोहिमेत माजी नगरसेविका योजना वाघमारे, दुर्गा शिंदे, स्वाती दयाळ, शोभा जाधव, अंजली वाघमारे, शुभांगी वाघमारे, वैशाली वाघमारे, रंजना वाघमारे,पुजा वाघमारे, स्नेहा जोशी,कुसुम राऊत,समर्थ वाघमारे यांनी सहभाग घेतला उपस्थित महिलांचे आभार दुर्गा शिंदे यांनी मानले.
error: Content is protected !!