मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहाचे प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या सभागृहात दि.२३ फेब्रुवारी २०२४ रोजी इ.१० वीच्या विद्यार्थींचा स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन हनुमंत मडके,शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब मडके,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,माजी मु.अ.शरद खंदारे,विद्याभवन हायस्कूलचे शिक्षक एस.जे.पवार हे उपस्थित होते. तर या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आदित्य शिवराम शिंदे यांनी प्रबोधन केले.त्याचबरोबर हनुमंत मडके व एस.जे.पवार यांनी देखील आपले विचार मांडले व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. अतुल झोरी,शिवम जाधव,श्रावणी मडके, राजनंदनी माळी,श्रुती इंगळे अंकिता बोराडे,दीक्षा मडके या विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपल्या गुरुबद्दल व आपल्याला आलेले अनुभव याबद्दल आपले अनुभव कथन केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व सहकारी बंधू-भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मडके यांनी केले तर मार्गदर्शन व आभार प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले