February 9, 2026

हाती धरून झाडू तू मार्ग झाडीलाशी,स्पर्शे तूझ्या महात्म्या ये थोरवी श्रमासी.!

  • राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘ग्रामस्वच्छता व नागरी अभियान राबविले. लोकसहभागातून स्वच्छतेचा मंत्र तत्कालीन ग्रामविकासमंत्री स्वर्गीय रावसाहेब रामराव पाटील तथा आर. आर. “आबा” यांच्या दूरदृष्टीने घेतलेला निर्णय गावंच्या गावे, हागणदारीमुक्त झाली. मानवमुक्तीचे प्रणेते संविधान निर्माते डॉ.भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर,माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढी तरी बहुजनांची लेकरं शिकवीन आशी शपथ घेतली ते कर्मवीर भाऊराव पाटील व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी हातात हात घालून* *महान कार्य केले.त्याला जागतिक स्तरावर तोड नाही.म.गांधी,नेल्सन मंडेला,बाबा आमटे,मदर तेरेसा यांनीही असहाय्य लोकांची सेवा केली.नव्हे कुष्ठरोग्यांच्या जखमा धुतांना त्यात परमेश्वर पाहिला. आज राजकारणाचा स्तर बदलला आहे.समाजमनाचं देणे घेणे नाही.दलबदलूचं चांगभलं,निष्ठा कोणावर ठेवायची? ज्यांना मानले मतं दिली.तोच रात्रीत झेंडा बदलत आहे.Delicated कार्यकर्ता आजही आपल्या स्वप्नांची, संसाराची वाताहात होईपर्यंत झिंदाबादच्याच तीन तीन दशके घोषणा देतो. जोपर्यंत मातीत मळलेल्यांना उचलून कडेवर घेत नाही. मनातील घाण साफ होणार नाही,तोपर्यंत सुंदर आणि विकसित राष्ट्र कसे होणार? आमसभा घेतल्या जात नाही. कंत्राटदार अन् सरकारी बाबू सामान्यांचे ऐकत* *नाहीत.नियमावर बोट ठेवतात.आवाज उठविणारांचा आवाज दडपला जातोय.!*
    *फोटोंत तीन दिग्गज एकत्र दिसताहेत. *खरेखुरे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे* *बाबा आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ! दुसरा स्वतंत्र फोटो आहे “केशव सिताराम ठाकरे” या परखड* *प्रबोधनकाराचा. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, आजच्या राजकीय पुढा-यांनी भावी* *पिढीला बेरोजगारी पासून मुक्त करावे. श्रेयवादासाठी करदात्यांचा पैसा केवळ इव्हेंटसाठी उधळू* *नये.राष्ट्रसंत गाडगे बाबा,यांनी केवळ रस्तेच झाडली नाही तर माणसाच्या मनावरील खोटया प्रतिष्ठेची धूळही झाडली.फक्त फोटोला हार घालून अभिवादन करुन कसे भागणार? प्रेरणादायी अनुकरणीय शाश्वत विकासाची कास धरली तरच* *भावी युवा पिढी आपला आदर्श घेईल.राष्ट्रसंत गाडगेबाबा,यांचे विचार* *आपल्या पुढील वाटचालीसाठी पुरेसे बोलके नि सूचक वाटतात.*
    *आज राष्ट्रसंत गाडगेबाबांची आज जयंती ! “हाती धरून झाडू तू मार्ग झाडीलाशी, स्पर्शे तूझ्या महात्म्या ये थोरवी श्रर्माशी.!लढाऊ, बेडर, कृतिशील राष्ट्रसंताला *विनम्र अभिवादन !*
  • *सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!*

 

  • – *@ समाजमित्र तात्यासाहेब सोनवणे
  • उपसंपादक सा.साक्षी पावनज्योत तथा अध्यक्ष रूग्णहक्क संघर्ष समिती, जीवन आधार फौंडेशन रेस्क्यू फोर्स, सोशल मीडिया ठाणे जिल्हा+ ९३२४३६६७०९
error: Content is protected !!