बदलापूर (पूर्व) ( तात्यासाहेब सोनवणे)- येथे जगतगुरू संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना लोकनेते आ. किसन कथोरे यांनी वरील विधान केले.ते पुढे म्हणाले की,कुळगाव बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आसल्याने या शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. रोजी रोटीच्या निमित्ताने या शहरात बंजारा समाज आला. कामगार, बिगारी म्हणून स्थायिक झाला. प्रामाणिकपणा हा त्यांचा गुण मला आवडतो. शहरात विकास होत असताना बंजारा समाजाचे योगदान नाकारता येत नाही आणि म्हणून संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील चौकाला महाराजांचे नाव देण्याची मागणी बसवराज राठोड यांनी केली ती तर सोमवारी मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाला माझे पत्र जाईलच.त्याही पुढे जाऊन आ. कथोरे म्हणाले की,या परिसरात म्हाडाचा आरक्षित भूखंड असेल तर मला सांगा माझ्या फंडातून, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघातील आ. निलय नाईक यांच्या फंडातून मोठा सभामंडप उभारणीला मदत करीन यासाठी कुठेही विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. यावेळी किरण भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज शहरात बांधकाम क्षेत्रात कुठेही जा बंजारा समाजाचा तेथे हातभार लागला आहे. आमदारांच्या आशिर्वादाने मी, “बेटी बचाओ” अभियानांतर्गत पहिली मुलगी झालेल्या मातेचा व सन्मान करुन, बाळांची निगा राखण्यासाठी “बेबी कीट” व पहिला विम्याचा हप्ता भरीत आहे. याबद्दल कोणीही मला कळवा त्याची जवाबदारी माझी असेल. यावेळी बंजारा समाजाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हरी राठोड,तारूशेठ राठोड,संयोजक भीमराव पवार,बंजारा समाजाच युवा नेतृत्व दत्तात्रय पवार,खजिनदार आनंद राठोड,आदी समाजबांधवाने आमदार महोदयांचा तसेच नगरसेवक किरण भोईर, संदेश तथा बाळाशेठ राऊत, यांचा सत्कार केला. व आभार मानले. या कार्यक्रमाला उद्योजक योगेशशेठ भोईर,भाजपा महिलाध्यक्षा सौ. मिनल मोरे, उपाध्यक्षा सौ. रती तथा विद्याताई पातकर, भाजपा भटक्या विमुक्तांच्या प्रदेश सदस्यां डॅशिंग शिलेदार सौ. मीरा राठोड, जेष्ठ समाजसेवक विलास जाधव, सौ.विजया विलास जाधव ,पक्षाचे अनेक पदाधिकारी समाजसेवक ,सौ.झालाबाई चव्हाण,सौ.अनुसया राठोड,सौ.बेबीताई राठोड,सौ.शारदाबाई पवार,सौ.शाहनीबाई राठोड,बंजारा समाज आंबा मातेची कवड्यांची माळ व महिला भगिनी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित होता.
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!