February 8, 2026

ओंकार सोनवणे यांच्या गझल गायकीने रसिक मंत्रमुग्ध

  • ‘आईने की दुकान’ संगीत रजनीत टाळ्यांचा कडकडाट
  • कुळगाव-बदलापूर (२४ ऑगस्ट २०२५) – आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या ‘आईने की दुकान’ या गझल संगीत रजनीत नवोदित गझल गायक ओंकार सोनवणे यांच्या गझल गायकीने रसिक मंत्रमुग्ध झाले. सभागृहात शिट्ट्या, टाळ्या, “वा! वा!” च्या गजरात गझलांचा आनंद रसिकांनी मनसोक्त लुटला.
    या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन संस्थेचे विश्वस्त रामभाऊ पातकर यांच्या हस्ते झाले.यावेळी मा.भाजपा शहराध्यक्ष संजयदादा भोईर यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी खुमासदार केले तर वाद्यसंगत सोहम जाधव व पार्थ सावंत यांनी दिली.
    ओंकार सोनवणे यांनी शारिक कैफी, बशीर बद्र, जॉं निसार अख्तर, वसीम बरेलवी, शकील आजमी, राहत इंदोरी यांच्यासह अनेक उर्दू गझलकारांच्या रचनांना आपल्या भावपूर्ण सादरीकरणातून जीवंत केले. “बंबई”, “मलाल”, “क्या बड़ी बात है” अशा गझलांनी रसिकांना थेट विचार करायला लावले.
    कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून आ.जे. म्युझिकल हिंगे साहेब, टाटा मेमोरियलचे सोशल वर्कर मयूर रोडगे, मुख्याध्यापिका सौ. सोनवणे, मुख्याध्यापक अनिल सोनवणे, प्रा. संदीप भेले, सौ. मीरा फांगणेकर, समाजसेवक गौतम बचुटे यांच्यासह महाविद्यालयीन शिक्षक, विद्यार्थी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    मराठी गझलकार सुरेश भट, भीमराव पांचाळे, प्रदीप निफाडकर, इलाई जमादार यांच्या गझला देखील सादर व्हाव्यात अशी रसिकांची अपेक्षा व्यक्त झाली. शहरात सांस्कृतिक चळवळीला चालना मिळावी म्हणून राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयातून भव्य ऑडिटोरियम उभारले जावे, अशी मागणीही या वेळी रसिकांकडून झाली.
    आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने अशा नवोदित प्रतिभांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
  • 📌 प्रसिद्धीसाठी: “जागल्या” समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे, महाराष्ट्र शासन
    उपसंपादक – साक्षी पावनज्योत
    अध्यक्ष – रुग्णहक्क संरक्षण समिती, जीवन आधार फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स
    सोशल मीडिया ठाणे जिल्हा – +९३२४३६६७०९
error: Content is protected !!