कळंब- शहरातील नगर पालिकेच्या दुर्लक्षांमुळे चोंदे गल्ली जुन्या पोस्ट ऑफिस समोर नालीतील पाणी प्रत्येक बोळीत जात आहे.त्यामुळे लहान मुलांना सुद्धा घराबाहेर पडणे शक्य होत नाही. शहरातील नगर पालिकेच्या प्रशासनास इथल्या रहिवाशांनी त्याबाबत अर्ज करून ही वस्तुस्थिती कळविण्यात आली होते तरी सुद्धा नगर पालिकेस या बाबींकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सोनार गल्लीतील जुन्या पोस्ट ऑफिस समोरील नाली साफसफाई करून पाणी काढून देण्यात यावे नगरपालिका मुख्याधिकारी यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यावर लक्षच नाही.फक्त नगरपालिकेचे कर्मचारी सध्या त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाकडे लक्ष देऊन नागरिकाची हेळसांड करत आहेत व शेवटी नगरपालिकेचे कर्मचारी मार्च मध्ये नगरपालिकेचा कर भरणा करून घेणे बाबत जनतेला त्रास देत आहेत असे येथील रहिवासी मोहन कोलंगडे यांनी म्हटले आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड