ढोकी (जयनारायण दरक) – धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील मोबाईल चोरीच्या संशयावरून काही तरुणांनी अमर लोमटे या 27 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. जनावराला मारावे तसे मारहाण केल्याने अमर याचा मृत्यू झाला असून ढोकी पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारहाणीची ही घटना ढोकी येथील तेरणा साखर कारखाना जवळ घडली असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. मोबाईल चोरीचा संशय घेऊन अमर लोमटे याला उसाने काठीने बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला.अमरचे वडील राजेंद्र लोमटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय उर्फ बबलू दत्ता इंगळे, संतोष दादाराव वाघमारे,अकबर शेख,शंकर चौधरी यांच्यासह आणि लोकांवर कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे हे करीत आहेत. पोलिसांनी काही आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेत आहेत.
More Stories
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जनकल्याण अर्बन को-ऑप बँक २०२४ वर्षी बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित