August 9, 2025

कळंबमध्ये राजमा ला मिळाला उच्चांकी भाव

  • कळंब – कृषि उत्पन्न बाजार समिती,कळंब जि.धाराशिव च्या बाजार समितीत आज मौजे सारोळा येथील शेतकरी सुनिल पवार यांनी आपला राजमा गुजाळ यांच्या आडत दुकाणी खुल्या ‍लिलावाने विक्री केला सदर राजमास बाजार समितीचे खरेदीदार मुंदडा व बलदोटा यांनी उच्च बोली लावून सदर राजमा 10,300/- रू.प्रति.क्विं ने खरेदी केला. बाजार समितीत तुर ही उच्चांकी भावाने जात असून तुरीला प्रति.क्विं 10,400 ते 10,600/- पर्यंत दर मिळत आहे. सद्या तुरीचे उत्पन्न कमी असल्याने भाव मात्र चांगले मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. बाजार समितीत अनेक योजना राबविताना बाजार समिती शेतकऱ्यांना प्राधान्य देत आहे. सद्या बाजार समितीत सिमेंट रस्ता,सी.सी.टी.व्ही उपबाजारपेठ सुधारणा,गाळे लिलाव आदी कामे प्रगतीपथावर आहेत. लवकरच लिलाव गृह शेतकरी भवन 5 मजली भव्य शॉपिंग काँप्लेक्स ज्यामध्ये 240 गाळे, कार्यालय, बँक,शेतकरी भवन,हमाल भवन, वस्तीगृह, विविध टेलिफोन कंपनीचे टॉवर उभारले जाणार आहेत. काही दिवसातच कायदेशीर बाबींची पुर्तता करून अतिक्रमणा सारखे विषय हाताळले जाणार आहेत.शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी उभा केलेल्या या बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीस आणावा.असे आवाहन सभापती शिवाजी कापसे व उपसभापती श्रीधर भवर, बा.स.चे सचिव दत्तात्रय वाघ व सर्व संचालक मंडळ यांनी केले.
error: Content is protected !!