कळंब – २०२४ या वर्षातील बँको ब्लू रिबन पुरस्कार जनकल्याण अर्बन को-ऑप बँक लि.कळंब ता.कळंब जि.धाराशिव येथील या बँकेस प्राप्त झाला. बँक सतत रिझर्व बँकेचे सर्व नॉर्म्स व्यवस्थितरित्या अवलंबते तसेच ज्या बँकेस ऑडीटमध्ये सतत ( अ ) वर्ग प्राप्त होतो अशा बँकेस हा पुरस्कार प्रदान केला जातो.यामधूनच राज्यातून अनेक सहभागी बँकामधून आपल्या या जनकल्याण अर्बन को-ऑप बँक लि. कळंब यांना ७५ ते १०० कोटी या श्रेणीत हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार सोहळा अँम्बी व्हॅली सिटी, लोणावळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.सहकारी बँकांसाठी लोणावळा येथे अँडव्हांटेज सहकार परिषद पार पडली.या परिषदेमध्ये रिझर्व बँकेचे माजी सर व्यवस्थापक भार्देश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.सदर पुरस्कार बँकेचे संस्थापक अध्यक्ष उमेश विठ्ठलराव कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ.वैशाली उमेशराव कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्वीकारला बँकेतील सर्व संचालकाचे व अध्यक्षाचे बँकेसाठी असलेले भरीव योगदान,समन्वय,बँकेचा पारदर्शक कारभार,ग्राहकांचे हित,सहकार खाते व रिझर्व बँक यांच्या सर्व नियमांची पूर्तता बँकेने केलेली असल्यामुळे सदर पुरस्कार प्राप्त झाल्याचे अध्यक्ष यांनी सांगितले.या पुरस्काराने बँक सन्मानित झाली याचे सर्व श्रेय बँकेचे खातेदार,सभासद, ठेवीदार,हितचिंतक यांचे असल्याचे बँकेचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी यांनी सांगितले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले