धाराशिव (जिमाका) – सामान्य नागरिकांना माहिती अधिकार कायद्यान्वये योग्य ती माहिती मिळत आहे, त्यामुळे हा कायदा प्रभावी असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांनी आज व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माहिती अधिकार दिन आज साजरा करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी माहिती अधिकाराबद्दल विस्तृत माहिती दिली.जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी करावयाची प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला.माहितीच्या अधिकारामध्ये दोन महत्वाच्या बाबी आहेत.माहिती पुरविणे आणि गोपनीय कारण देता येणार नाही, अपवाद कलम 8 तसेच माहिती विहीत मुदतीत पुरविणे.कार्यालयाचे कामकाजाबाबत अधिनियमांच्या कलम 4 प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशद्वाराजवळ माहिती अवलोकनार्थ ठेवावी. त्या माहितीचे सुचना फलक दर्शनी भागात लावावे. कलम 5 प्रमाणे कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात सहायक जनमाहिती अधिकारी,जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा कार्यासनाप्रमाणे ठळक अक्षरात माहिती लावावी,तसेच माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयात स्विकारतांना सहायक जन माहिती अधिकारी नियुक्त करावा.आपल्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात ठळक दिसेल अशा दर्शनी भागात नियुक्त जन माहिती अधिकारी यांच्या नावाचा फलक दर्शनी भागात लावावा.तसेच सर्व माहितीच्या अर्जाचा पत्रव्यवहार व माहिती पुरविणे हे जन माहिती अधिकारी यांनी स्वत: जनमाहिती अधिकारी म्हणून करावयाचे आहे. आपल्या कार्यालयाची कोणत्याही माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चाकरिता प्रति पृष्ठ 2 रुपये याप्रमाणे व पोष्टाचा खर्च सुरूवातीलाच संबंधिताना कळविणे, अतिरिक्त खर्चाचा भरणा करुन माहिती अधिकारी यांचेकडे पावती सादर केल्यानंतरच माहितीच्या छायांकित प्रती काढण्याची प्रक्रिया करावी, विचारलेली माहिती ही माहिती अधिकाऱ्यांशी संबंधित नसेल तर ती योग्य त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याकडे किंवा सार्वजनिक प्राधिकरणाकडे 5 दिवसात हस्तातरीत करावी.तसे अर्जदारास कळवावे.पत्र व्यवहार केल्यास पोस्टाचे पुराव्यासहीत कार्यालयात ठेवावे.या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी संतोष भोर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने,नायब तहसिलदार कुलदीप कुलकर्णी, नायब तहसिलदार श्रीमती अर्चना मैदर्गी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले