August 8, 2025

महाराष्ट्र लोकविकास मंचच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वनाथ तोडकर यांची नियुक्ती

  • संभाजी नगर – स्वयंसेवी संस्थांची संघटना म्हणून कार्यरत असलेल्या, महाराष्ट्र लोक विकास मंचची,राष्ट्रीय कार्यकारणी व प्रांत प्रमुखांची निवड, दि.22 सप्टेंबर 23 रोजी, मंचच्या सर्वसाधारण बैठकीत करण्यात आली.
    या निवडणुकीचे अध्यक्ष म्हणून एम एन कोंढाळकर यांनी कामकाज पाहिले तर, निवड प्रक्रियेचे प्रस्ताविक भूमिपुत्र वाघ यांनी केले. त्यानंतर बैठकीत सर्वानुमते राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वनाथ आण्णा तोडकर यांची नियुक्ती करून खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
    राष्ट्रीय समिती
    राष्ट्रीय अध्यक्ष – विश्वनाथआण्णा तोडकर, संभाजीनगर,राष्ट्रीय उपाध्यक्ष – एम एन कोंढाळकर, पुणे,राष्ट्रीय सचिव – भूमिपुत्र वाघ, धाराशिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष – मनीषाताई घुले, बीड, राष्ट्रीय संघटक – रमाकांत बापू कुलकर्णी, पुणे, प. महाराष्ट्र विभाग अध्यक्ष – अरुण जाधव, अहमदनगर,मराठवाडा विभाग अध्यक्ष ओमप्रकाश गिरी, बीड,अमरावती विभाग अध्यक्ष – बंडू आंबटकर, अमरावती, कोंकण विभाग, प्रभारी अध्यक्ष – एम एन कोंढाळकर, पुणे, उत्तर महाराष्ट् विभाग, प्रभारी अध्यक्ष – पुष्कराज तायडे, जालना., बीड जिल्हा प्रमुख – बाजीराव ढाकणे,लातूर जिल्हा प्रमुख – बालाजी शिंदे,जालना जिल्हा प्रमुख – पुष्कराज तायडे
    यांची निवड करण्यात आली.
    उर्वरित जिल्हा प्रमुखांची निवड लवकरच करण्यात येणार आहे.
    यावंबैठकीचे अध्यक्ष, कोंढाळकर व मलोविमचे अध्यक्ष विश्वनाथ आण्णा तोडकर यांनी, निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला व निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर भूमिपुत्र वाघ यांनी आभार मानून बैठकीचा समारोप केला.
error: Content is protected !!