August 8, 2025

आदरणीय अशोकदादा मुळे, प्रवर्तक डिंपल पब्लिकेशन मुंबई, सह्रदय धन्यवाद!

  • चाळीस दशकाचा प्रवास मी वाचला. “माय मराठी”, शेवटचे आचके देत असताना, नवी पिढी फेसबुक, वॅटस्अप,माध्यमातून पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकले असताना,दादा, वाचनसंस्कृती लोप पावत असताना मंदीच्या काळात वादळवाऱ्यात वसईतील रहात्या घरात पावसाचे पाणी, आपल्या गिरगावातील प्रकाशन कार्यालयात पाणी.. तरीही अतिशय नेटाने आपण नवोदित, प्रगल्भ साहित्यिकांना उजागर करीत आहात. बघता बघता पन्नाशी, कशी झाली मला कळले नाही. ठाणे येथे भरलेले इस. सन. २०१० ला, ती भेट आपल्या संघर्षाची अन् उत्तुंगतेची पावती.तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पवार, वंदनीय बाळासाहेब आदरणीय, ठाकरे,वाजपेयी, मा. अडवाणी,आदरणीय शरद पवार, लता मंगेशकर,पद्मश्री नारायण सुर्वे ,विजया वाड, अशोक समेळ, ,वायंगणकर, गवाणकर, अशोक बागवे,अरुण म्हात्रे, भीमराव पांचाळे, नेहाताई सावंत, आशा अनेक दिग्गजांची पुस्तके प्रकाशित केली. आज परत लेखक कवींची प्रकाशित करून प्रकाशक म्हणून सुवर्ण महोत्सवी साजरा केलात. प्रकाशक मा.नम्रताताई यांस मनापासून आभार.! आ. हितेंद्र ठाकूर अप्पांचे सहकार्य आहेच,उमद्ये प्रकाशक,कौतुक,कल्पक,यांना शुभेच्छा.! आमचा “शाळा उपेक्षिची,” कवितासंग्रह प्रकाशित कराल आशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सुवर्ण महोत्सवी डिंपल पब्लिकेशनचा हिरक काय? अमृतमहोत्सव साजरा होईल यात शंका नाही.!
  • – “जागल्या ” तात्यासाहेब सोनवणे, सोशल मीडिया ठाणे जिल्हा+ ९३२४३६६७०९

error: Content is protected !!