August 8, 2025

कायदेशीर प्रश्न जर सोडविले गेले नाही तर माथाडी कामगार ५ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करणार – साथी सुभाष लोमटे

  • संभाजीनगर – कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविले गेले नाहीत तर माथाडी कामगार ५ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करतील असा इशारा महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या निदर्शनाचे वेळी दिला.
    मराठवाडा लेबर युनियन – महारष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे वतीने आज कामगार उपायुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या निदर्शना चे वेळी साथी लोमटे बोलत होते.
    शासकीय धान्य गोदामातील द्वार पोंच सह सर्व काम नोंदीत माथाडी कामगाराकडूनच करून घेतली पाहिजेत, वेतनातील फरक, महागाई निर्देशांक, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांची लायसेन्स तात्काळ रद्द करणे, नियमित वेळेवर पगार होणे , कालमर्यादेत पडताळणी, बेकायदेशीर रित्या कामावरून काढलेल्या माथाडीना पूर्ववत कामवर घेणे , थकबाकी वसुली , कामाच्या ठिकाणी पाणी व अन्य सुविधा, या व अन्य कायदेशीर मागण्यासाठी आज निदर्शने करण्यात आली.
    जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने झाल्यावर, माथाडी कामगारांचे शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी मा. विधाते व जिल्हा पुरवठा अधिकारी मा. भोसले यांची भेट घेतली व मागण्यांचे निवेदन दिले.
    सर्वच प्रश्नावर जिल्हाधिकारी परत आल्यावर बैठक लावण्यात येईल व सर्व प्रश्न लावण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.
    जिल्हा माथाडी मंडळाचे अध्यक्ष व कामगार उपायुक्त यांनी बाहेर गावी असल्याने बैठक ३१ तारखेस घेण्याचे मान्य केले.
    बैठका होवून मार्ग निघाल्यास ठीकच, नाष्टा ५ फेब्रुवारी पासून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार सर्व माथाडी कामगारांनी पुन्हा केला.
    आजच्या निदर्शनात साथी छगन गवळी, साथी देविदास किर्तीशाही, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव, गोदाम टोळी प्रमुख संतोष म्हैसमाले, सचिन पगारे, खालेद भाई,राजू नवले,सलीम शेख,किशोर मगरे,प्रवीण मगरे,गणेश तरटे,कल्याण तुपे,आशिष आढाव,शिवाजी राऊत,गौतम मगरे आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!