August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयास विद्यार्थ्यांनी दिले पुस्तके भेट

  • मोहा – ज्ञान प्रसार विद्यालय मोहा येथे “आपले ग्रंथालय – समृद्ध ग्रंथालय ” या उपक्रमाअंतर्गत दि.२९ जाने २०२४ रोजी इयत्ता पाचवी मधील आयातखाँ पठाण या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवसानिमित्त दोन पुस्तके ग्रंथालयाला भेट दिली.
    त्यामुळे त्याचा सत्कार व वाढदिवसाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या.”वाचाल तर वाचाल “या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे अनेक पुस्तकांची मेजवानी मिळणार आहे . ग्रंथालयात हेच पुस्तके वाचायला मिळणार आहेत.”आपले ग्रंथालय – समृद्ध ग्रंथालय “या उपक्रमाचे कौतुक ज्ञान प्रसार विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक संभाजी गिड्डे यांनी केले.या वेळी सहशिक्षक शेवाळे कमलाकर , शहाजी सोलनकर,श्रीमती . पांचाळ उषा ,श्रीमती.सोनवने निता ,जाधव मामा आदीं उपस्थित होते .
error: Content is protected !!