August 8, 2025

आरक्षण मिळाल्याने कपिलापुरीत जल्लोष

  • परंडा – मराठा समाजाला ओ बी सी प्रवर्गातून ५० % आत आरक्षण मिळावे या मागणी साठी गेली कित्येक वर्षे हा संघर्ष सुरू होता.या प्रयत्नात कित्येक मराठा बांधवांनी आपले प्राण गमवले.मात्र मराठा समाजाचे शांततापूर्वक नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण,संघर्ष यात्रा,सभा अखेरीस महाराष्ट्राची राजधानी मुंबई वर धडक मोर्चा घेऊन राज्य शासनास आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले.
    कपिलापुरी येथे छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीस पुष्पहार अर्पण करून तरुणांनी आतिषबाजी केली,तसेच मराठा समाज बांधवांनी एकमेकांना मिठाई भरवून शुभेच्छा देऊन हा मराठा आरक्षण विजय दिवस साजरा करण्यात आला.
    मराठा समाजाच्या पुढच्या पिढीसाठी आपल्या जीवाची बाजी लावल्यारे मनोज जरांगे पाटील व मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी सरकार सकारात्मकता दाखवून सकळ मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य केल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.रणजीत पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.याप्रसंगी नरसिंह पाटील, बाळासाहेब पाटील,उद्घव पाटील,धर्मराज पाटील,सचिन पाटील,सुजित पाटील, शिवाजी पाटील,सम्राट पाटील,रोहित पाटीलअभिजित पाटील,पार्थ पाटील,तुषार टेम्बे, संदीप कुंभार,मनोज जैन,रणवीर गोडगे, आरोही पाटील इ उपस्थित होते.
error: Content is protected !!