August 8, 2025

युवकांच्या सेवावृतीतून राष्ट्र उभारणी शक्य – दिवेकर

  • घारगाव – येथील राष्ट्रीय सेवा योजना योजना शिबिर युवक ही देशाची खूप मोठी शक्ती असून युवकांना विधायक कार्याची दिशा दिल्यास युवकांच्या सेवावृत्तीतून देशाची उभारणी होऊ शकते असे मत नॅचरल उद्योग समूहाचे जनरल मॅनेजर यु.डी.दिवेकर यांनी यांनी व्यक्त केले.
    रांजणी येथील साई संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने” युवकांचा ध्यास,ग्राम विकास” हे ब्रीद घेऊन राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन मौजे घारगाव तालुका कळंब येथे करण्यात आले आहे.यावेळी ते बोलत होते. यावेळी शरदचंद्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.साजेद चाऊस, शिराढोन पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक के. बी.नेहरकर, गावचे सरपंच हिम्मत पाटील, माजी सभापती दत्तात्रय साळुंके,ग्रामसेवक सुभाष चोरमोले, कृषि सहाय्यक पालकर,प्राचार्य जे.सी.गवळी , श्रीराम साळुंके आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना दिवेकर म्हणाले की,खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सेवा योजना संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यात सामाजिक समस्याची जाणीव निर्माण होते. युवकांना विधायक कार्याची दिशा दिल्यामुळे त्यांच्यात समर्पितभाव व सेवावृत्ती जोपासली जाऊन राष्ट्र उभारणी होते.यावेळी डॉ.चाऊस यांनी ग्रामीण पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज महत्त्वाची असल्याचे भाषणात मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन ऋतुजा पानढवळे व प्रतिभा कोल्हे यांनी प्रास्ताविक प्राचार्य जे.सी.गवळी यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी ए.डी.जाधव यांनी मानले. प्रमुख मान्यवर व विद्यार्थ्यांच्या हस्ते गावाची स्वच्छता राबवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.एम.के. साबळे, एन.एम .चाउस,प्रा. ए.डी.जाधव,प्राध्यापिका एस.आय.शेख, एम.आय.शिंदे, पी.जी.मोरे, डी.एल.शेळके , यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!