August 8, 2025

जादूटोणा-करणी-भानामती,कोणत्याही खऱ्या धर्माचा आधार होऊ शकत नाही. – ॲड.अजय वाघाळे

  • धाराशिव (राजेंद्र बारगुले ) – दिनांक २३/०१/२०२४ रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिर मौजे वरुडा तालुका जिल्हा धाराशिव येथे आयोजन करण्यात आले होते, सदरील शिबिरामध्ये
    ग्राम स्वच्छता, अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनमुक्ती, वृक्ष लागवड, जलसवृधन,बाल-विवाह, महिला जनजागृती इत्यादी विषयी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले.
    त्याचाच एक भाग म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा प्रतिबंध कायदा याविषयी ॲड.अजय वाघाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बाळासाहेब गाढवे हे उपस्थित होते, कार्यक्रमाचे उद्घाटन बिन वातीचा पाण्यावर प्रजोलित
    होणारा दिवा पेटवून करण्यात आले ,कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड.अजय वाघाळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आधारित चमत्कार मागील विज्ञान प्रयोग प्रात्यक्षिकांसह दाखवले त्यामध्ये साखळ दंड तोडणे ,कलेक्शन मधून वेगवेगळ्या नद्यांचे पाणी काढून दाखवणे ,दोरीला एका दिशेमध्ये आणणे ,नारळामधून करणी भानामतीचा भांडाफोड करणे विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय लागावी म्हणून प्रश्नचिन्ह दाखुऊन त्याचे महत्त्व सांगण्यात आले ,समाजातील तथाकथित भोंदू ,बाबा मांत्रिक- तांत्रिक यांचे पितळ उघडे करून दाखवण्यासाठी संतांचे विचार सांगितले,,वाघाळे म्हणाले की चमत्काराचा दावाकरून अर्थिक प्राप्ती करणे, भूत भानामातीची भीती दाखवणे , अफवा पसरवने,साप विंचू कुत्रा चावल्यावर विष उतरवण्याच्या भाण्यने अघोरी उपचार करने,जादूटोणाकायद्यानेगुन्हाअसल्याचे ते म्हणाले.
    या प्रसंगी राष्ट्र सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी
    प्रा माधव उगीले, प्रा. बालाजी नगरे, प्रा मोहन राठोड, प्रा. शिवाजीराव गायकवाड, बन्सीलाल मुळे, मुकेश सनेर, माजी सरपंच खंडेराव गाढवे, व स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!