August 8, 2025

शहरात मराठा आरक्षणाचा जल्लोषात स्वागत

  • कळंब ( महेश फाटक ) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.२७ जाने २०२४ रोजी सकल मराठा समाज कळंब यांच्यावतीने राज्य सरकारने अध्यादेश दिल्या निमित्ताने व आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे सर्व मराठा ज्येष्ठ व युवकांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार व गुलाल लावून जय भवानी जय शिवाजी घोषणा देत व डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद उत्सव साजरा केला.
    येथील मराठा समुदायाने प्रथमतः स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, राजमाता जिजाऊ माँसाहेब,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णासाहेब पाटील, अण्णासाहेब जावळे,विनायक मेटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
    कळंब शहरातील सावरकर चौक येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे होर्डिंग लावून पेढे वाटून व गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्साह साजरा केला. यावेळी ॲड.मनोज चोंदे,शंकर गिलबिले,उत्तरेश्वर चोंदे, राहुल चोंदे,महेश फाटक,आश्रुबा घाडगे, अशोक चोंदे,इमरान सय्यद, हनुमंत थोरात,रघुनाथ रमिष्ट डोंगरे व सर्व मराठा समाज बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!