August 8, 2025

विद्यापीठ उपपरिसरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

  • धाराशिव – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा झाला. इंग्रजी विभागातील सहयोगी प्रा. डाॅ. गोविंद कोकणे यांनी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. लोकशाहीत मतदान अधिकाराचे महत्व आहे. योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्याच्या प्रक्रियेत मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही टिकवण्याची जबाबदारी मतदारांवर आहे. निवडणुकी प्रक्रिया स्वतंत्र व पारदर्शक वातावरणात पार पडते. सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डाॅ. राहुल खोब्रागडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी निवडणूक प्रक्रियेचे यश सुजाण मतदारांवर असते, असे म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना
    कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघशाम पाटिल यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले. ऋत्विक रामदासे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!