कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या मातोश्री व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या पत्नी सुमनबाई ज्ञानदेव मोहेकर यांचे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ०९.३० वाजता वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दत्तनगर कळंब येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. २६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०२.०० वाजता कळंब येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमनबाई मोहेकर यांची अंत्ययात्रा दत्तनगर येथून निघून देवी रोड,मदिना चौक,अहिल्यादेवी होळकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, प्रियदर्शनी अर्बन बँकेच्या कॉर्नरहून स्मशान भूमीकडे शोकाकुल वातावरणात आणि टाळ मृदंगाच्या गजरात नेहण्यात आली. डॉ.अशोक मोहेकर यांच्या हस्ते मातोश्री सुमनबाईस अग्नी देण्यात आल्यानंतरत्यांचे बंधु पडवळ,डॉ.जगदाळे,पी.एस.शिंदे,डॉ.हरिदास फेरे,डी.के.कुलकर्णी, ह.भ.प.महादेव आडसूळ महाराज आदिनी आपल्या मनोगतातून त्यांचे कार्य विषद केले.तर दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून सर्वांच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. सुमनबाईनी स्वतःच्या अंगावरील दागिने विकून ज्ञानदेव गुरुजींना शाळा चालवण्यासाठी साथ दिली होती तर वसतिगृहातील मुलांना स्वतःहा स्वयंपाक करून सांभाळले असल्याच्या आठवणींना उजाळा देत असतानी प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता. या प्रसंगी सर्वच स्तरातील समाज बांधव व संस्थेचे कर्मचारी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले