हावरगाव – येथील आकाश परसराम हजारे यांची तलाठी भरती मध्ये धाराशीव जिल्ह्य़ात 192 मार्क मिळवून एस्सी प्रवर्गातून दुसरा नंबर घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. आकाश याने भारती विद्यापीठ खारघर इंजिनिअरिंग काॅलेज मधून बी ई(केमीकल) ही पदवी घेतली आहे. सामान्य कुटुंबातील आकाशने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील स्टडी रुम मध्ये सेल्फ स्टडी करुन यश संपादन केले आहे. या यशाबद्दल हावरगाव येथील तरुण मुलांनी गावातून आनंदाने भव्य अशी गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रतिष्ठित नागरिक आर. के.कोल्हे,सरपंच हरीभाऊ राऊत, ग्रा.प.सदस्य व वंचित बहूजन आघाडीचे जिल्हा नेते अनिल हजारे, भाजप नेते सतपाल भाऊ बनसोडे,आरपीआयचे किशोर वाघमारे, विष्णू कोल्हे,कामगार नेते डि.टी.वाघमारे,सुरज वाघमारे, विशाल वाघमारे, आप्पासाहेब हजारे, सायस हजारे यांनी आकाश हजारे व वडील परसराम हजारे यांचा सत्कार केला. सर्व महिलांनी औक्षण करून अभिनंदन केले पुढिल कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले