कळंब (जयनारायण दरक)- कळंब तालुक्यातील बाभळगाव येथे सरपंच सौ.विजयश्री वाघमारे यांच्या पुढाकाराने गावा मध्ये महीला मेळावा घेण्यात आला. तसेच मेळाव्याचा उद्देश की सर्व महीलानी प्रशिक्षण घेऊन सर्वानी स्वःताचे व्यवसाय चालू करावे. तसेच कार्यक्रमा चे अध्यक्ष सौ. अश्विनी कुंभार यांनी महिलाना छोटे छोटे व्यवसाय चालु करून महीलांनी सक्षम कसे बनावे यांचे मार्गदर्शन केले तसेच भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था धाराशिव,प्रशिक्षक अवधुत पौळ यांनी महीलांना सर्व प्रशिक्षणा बद्दल मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम साठी कळंबचे विभाग प्रमुख बनसोडे यावेळी म्हणाले की, महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्यवसायासाठी आपण प्रयत्नशील राहू,शेवटी सरपंच महीला सौ. सुजाता वाघमारे यांनी सर्वाचे आभार व्यक्त केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले