कळंब- येथील ज्ञान प्रसारक मंडळ द्वारा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष -(२०२३-२४) मराठी , हिन्दी आणि इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भाषा वाड;मय मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी उद्घाटक प्रा.भास्कर चंदनशिव बोलतांना म्हणाले की,” कथा, कादंबरी, नाटक, चरित्र आणि आत्मचरित्र असे साहित्य वाचनाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास होतो.अवांतर अफाट वाचनाने शब्द संग्रह वृध्दींगत होतो, त्यामुळे साहित्याचे व्यापक स्वरूप लक्षात येते. तसेच हा शब्दसंग्रह प्रसंगानुसार जपून वापरणे आवश्यक आहे. मानवी जीवनात आचार विचार, लेखन स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय आणि बंधुता आदी मूल्यांना महत्व आहे. अशा दर्जेदार साहित्यातून मानवी जीवन समृध्द होते,असे मत व्यक्त केले.व्यासपीठावर संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,डॉ.के.डी.जाधव, डॉ.रमेश कांबळे, प्रा.पंडित शिंदे, प्रा.ए.आर. मुखेडकर, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा व्यवस्थापक मानवेंद्र पटेल तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानिमित्ताने नुकताच यशवंतराव चव्हाण स्मृती प्रतिष्ठान अंबाजोगाईचा स्व. भगवानराव लोमटे राज्यस्तरीय स्मृती पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.भास्कर चंदनशिव यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
यावेळी कविता,कथा, ललित, संपादित विषयावर तयार केलेल्या अंकुर या भितीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. निबंध स्पर्धा आणि भाषण स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सुनील पवार म्हणाले की, आपली भाषा सामाजिक संस्था असून लवचिक, परिवर्तनशील आहे. समाजातील अनेक शब्द कालोघात कालबाह्य होतात आणि तितकेच नव्याने शब्दांची भर पडत असते.
यावेळी प्रा. पंडीत शिंदे, प्रा. डॉ. रमेश कांबळे यांनीही आपले विचार मांडले. यावेळी प्रा.डॉ.डी.एन.चिंते, प्रा.एन.एम.अंकुशराव, ग्रंथपाल प्रा.अनिल फाटक, प्रा. बालाजी वाघमारे, प्रा.बालाजी बाबर, प्रा. मारुती शिंपले, प्रा.प्रियंका पवार, प्रा. काकडे, डॉ.ईश्वर राठोड, डॉ.आर. व्ही. ताटीपामुल, प्रा.एन.जी.साठे, प्रा.अमोल शिंदे, प्रा. हनुमंत चादर,वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी, सूत्रसंचालन डॉ.दत्ता साकोळे, तर आभार मराठी विभागप्रमुख डॉ.डी.ई.गुंडरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अरविंद शिंदे, प्रकाश गायकवाड, संदीप सूर्यवंशी,हनुमंत जाधव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले