August 8, 2025

भगतसिंगांचे बलिदान कायम स्मरणात राहील – सतीश काळे

  • पुणे – भगतसिंग खरे देशभक्त होते. ज्यांनी तरुणांच्या अंतःकरणामध्ये स्वातंत्र्याची आवड निर्माण केली. त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची भावना निर्माण केली. भगतसिंग यांनी गुलाम भारताला मुक्त करण्यासाठी दिलेले बलिदान आणि त्याग कधीच विसरता येणार नाही, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केले.
    दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाला मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, कार्याध्यक्ष वैभव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण पाटील, संघटक रशीद सय्यद, योगेश जाधव, निखिल पवार, बालाजी तांबे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
    काळे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी, भगतसिंग हे सर्व तरूणांचे युवा प्रतीक होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुण पिढीला प्रेरित केले. लहानपणापासूनच त्यांनी भारतीयांवर होणारे ब्रिटिश अत्याचार पाहिले होते आणि त्यामुळेच त्यांनी अगदी लहान वयातच देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षपूर्ण होते. आजचे तरुणही त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेत असल्याचे काळे म्हणाले.
error: Content is protected !!