August 9, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सरला खोसे तर कार्याध्यक्षप अप्सरा पठाण

  • धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिवच्या महिला जिल्हाध्यक्षपदी सरला दिनकरराव खोसे पाटील व महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी अप्सरा मुजीब पठाण यांची महिला प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आली.
    त्यांनतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीदिनी महिलांना प्रोत्साहन व महिलांचा सन्मान करत प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१२ ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात श्रीमती सरला दिनकर खोसे पाटील यांना महिला जिल्हाध्यक्ष पदाचे व सौ.अप्सरा पठाण यांना महिला जिल्हाकार्याध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. सर्व स्तरांमधून नियुक्त महिला पदाधिकारी यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
    आगामी होणाऱ्या निवडणुकानसाठी या नियुक्त्या अधिक महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.याचा पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
    यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप , माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, माजी अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे, विद्यार्थि जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,तुळजापूर तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर,उषा लगाडे, रुक्मिणी कुंभार,सुलोचना जाधव, संगीता शिंदे,मंगल पतंगे,मनीषा साळुंखे,लक्ष्मी सुरवसे,उषा पेठे,विनोद अवतारे,अरफात काझी उपस्थित होते.

error: Content is protected !!