August 9, 2025

सत्यशोधक चित्रपट राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने अल्प दरात

  • कळंब – महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपट राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने अल्प दरात गुरुवारी (दि११) शहरातील चित्रपट गृहात दाखवण्यात आला.
    याबाबत वृत्त असे की, महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा धगधगता संघर्ष उलगडवीणारा सत्यशोधक हा चित्रपट शुक्रवारी(दि११) धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील पृथ्वीराज थिएटर मध्ये फक्त वीस रुपये स्वागतमूल्य स्वीकारून दाखविण्यात आले.सदरील चित्रपट राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संतोष भोजने, अरुण माळी,ज्ञानेश्वर तोडकर, टी.जी.माळी, सचिन डोरले,दिपक जाधव, निलेश पांचाळ, राजेंद्र खडबडे आदीच्या वतीने दाखवण्यात आला.
error: Content is protected !!