शिराढोण (परमेश्वर खडबडे ) – कळंब तालुक्यातील मौजे शिराढोण येथील क्रांती नगर पारधी पेढी गायराण जमीनी मध्ये दि.१२ जानेवारी २०२४ रोजी विविध विषयांवर बैठक घेण्यात आली. या बैठकिमध्ये श्रमिक मानवाधिकार संघ, पोलीस,व तहसिल यंत्रणा यांची उपस्थिती होती. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,कळंब तालुक्याचे तहसीलदार प्रिया वंदा म्हडकदकर, शहाजी पाटील, श्रमिक मानवाधिकार संघाचे भाई बजरंग ताटे यांनी मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर,पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर पाटील, दैनिक आरंभ मराठीचे पत्रकार अमरसिंह चंदेल, किरण पाटील, शिराढोण ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी करपे या वेळी उपस्थित होते.या वेळी महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, वृद्ध शेतमजूर, पेन्शन योजना इत्यादी प्रश्नावर चर्चा करण्यात आली. व सदर ठिकाणी पारधी आदिवासी चे १६ प्रमाणपत्र वाटप करण्यात आली. या कार्यक्रमांमध्ये ० ते६ वयोगटातील लहान बालकांची आधार कार्डही काढण्यात आली. या कार्यक्रमात निवासी अतिक्रमण व शेती प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नावे करा हे प्रश्न समोर आले. या वर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी सर्व यंत्रणेच्या अधिकारी यांनी आदिवासी पारधी समाज बांधवांना मार्गदर्शन केले.या बैठकिसाठी मोठ्या संख्येने पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
‘दैनिक लोकमत’ समूहातर्फे शिराढोण येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न आला.
खर्च वाचला तर आत्महत्या थांबतील – सत्यपाल महाराज
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर