April 29, 2025

Home »ई-पेपर वेद शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

वेद शैक्षणिक संकुलात सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

  • कळंब (महेश फाटक ) – कळंब येथील डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयटीआयच्या निदेशिका कोमल मगर या होत्या तर कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून विद्याभवन हायस्कूलच्या ज्येष्ठ साहित्यिका अलका टोणगे,सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या सहशिक्षिका डॉ.प्रतिभा गांगर्डे,सुमन जाधव या उपस्थित होत्या.
  • यावेळी विद्याभवन हायस्कूलच्या शिक्षिका अलका टोणगे,सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या सहशिक्षिका डॉ.प्रतिभा गांगर्डे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला उजाळा दिला तर कोमल मगर यांनीही अध्यक्ष समारोप करताना सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज गरज असल्याचे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांमधून साक्षी सोनवणे या विद्यार्थिनींनीही आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहा शिरसट,सूत्रसंचालन रागिनी कानगे तर आभार साक्षी वायसे या विद्यार्थिनींनी मानले हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनीच आयोजित केला होता.
  • या कार्यक्रमास भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने, प्रा.श्रीकांत पवार, निदेशक अविनाश म्हेत्रे,विनोद जाधव,निदेशक सागर पालके,लिपिक आदित्य गायकवाड, विनोद कसबे व सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!