कळंब (महेश फाटक ) –
स्व.गणपतराव कथले युवक आघाडी ही गेल्या अनेक वर्षापासून एक जानेवारी म्हणजेच नववर्षाला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करते हा उपक्रम स्तुत्य तर आहेच मात्र अनुकरणीय देखील असल्याचे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी मॅरेथॉन बक्षीस वितरण प्रसंगी केले. यावेळी उपविभागीय पोलीस उप अधिक्षक संजय पवार,पोलीस निरीक्षक सुरेशजी साबळे,राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक डॉ.बाळकृष्ण भवर, क्रीडा मार्गदर्शक लक्ष्मण मोहिते,प्रा.संजय घुले, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ चौधरी,राजकीय कट्टा चे संपादक सतीश मातने,राजेंद्र बिक्कड ,बापू भंडारे,डॉ नीळकंठ चोपणे,जगदीश गवळी चर्मकार महासंघ युवक मराठवाडा अध्यक्ष विकास कदम,दत्तात्रय लांडगे,प्रवीण तांबडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना डॉ.प्रतापसिंह पाटील म्हणाले की,व्यायाम ही काळाची गरज असून क्रीडांगणाशी मुलांचे व तरुणांचे नाते तुटत असताना अनेक लोक नवीन वर्षात व्यायाम करण्याचे संकल्प करतात मात्र त्याला मूर्त रूप देण्याचे काम स्व. गणपतराव कथले युवक आघाडीच्या वतीने करण्यात आले त्याबद्दल त्यांचे कौतुक देखील केले.यावेळी पोलीस उपाधिक्षक संजय पवार,पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, प्रा.बाळकृष्ण भवर, प्रा.संजय घुले,अतुल गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब कथले, सूत्रसंचालन राजेंद्र बिक्कड व आभार यश सुराणा यांनी मानले.
या मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
कथले आघाडीचे बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा,शाम जाधवर, बाळासाहेब जाधवर,रमेश अंबिरकर, गोविंद खंडेलवाल,भाऊसाहेब शिंदे, अशोक फल्ले, बालाजी सुरवसे,यश सुराणा, संताजी वीर,नवनाथ पुरी,किरण फल्ले, महादेव देवकते, धर्मराज पुरी, वैभव कोळपे,राहुल किरवे,विश्वजित पुरी यांनी प्रयत्न केले.
* हे ठरले कळंब मॅरेथॉनचे विजेत
6 ते 15 वयोगट मुली
स्वाती वाघमारे (प्रथम),संजना आवाड(व्दितीय ) संध्या डोंगरे (तृतीय)
6 ते 15 वयोगट मुल
निरंजन मरकड(प्रथम) ऋषिकेश अभंग(व्दितीय) महेश अभंग (तृतीय)
15 ते 45 पुरुष गट
शेख समीर (प्रथम क्रमांक)जाधवर विराज (द्वितीय क्रमांक) तीर्थकर सुजित (तृतीय क्रमांक)
15 ते 45 महिला
योगिनी फुगारे (प्रथम) स्वाती बसू (द्वितीय) व राजनंदनी सुरवसे (तृतीय)
45 पेक्षा जास्त वयोगट पुरूष
सुरेश काकडे (प्रथम) रामचंद्र इंगळे (द्वितीय) रामचंद्र जाधवर (तृतीय)
45 पेक्षा जास्त वयोगट महिलांमधून स्वाती कांबळे व सुवर्णा सुरवसे या विजेते ठरले
More Stories
चि.सिद्धार्थ सुतार एमटीएस ऑलिंपियाड परीक्षेत राज्यात पाचवा
शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार
शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार