कळंब – शहरातील मुंडे गल्ली येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळाने यावर्षी एक अभिनव उपक्रम सादर करून शहर वासियांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
या मंडळाच्या देखाव्यामध्ये विविध नैसर्गिक,सामाजिक संदेश देणारे पोस्टर्स गणेश मंडळाच्या परिसरात लावले आहेत.
याप्रसंगी या गणेश मंडळाचे अध्यक्ष गजानन मुंडे म्हणाले की,इतर सर्व गणेश मंडळाप्रमाणे मुर्तीचे देखावे किंवा जिवंत देखावे सादर करण्या ऐवजी या वर्षी आमचे मंडळ समाज उपयोगी असा पर्यायवरण आधारीत पोस्टर/ पत्रक देखावा सादर करत आहोत.
या देखाव्या साठी गणेश मंडऴाचे अध्यक्ष गजानन मुंडे,उपाध्यक्ष संगमेश मेनकुदळे,उपाध्यक्ष मंथन करवलकर,कार्याध्यक्ष संकेत मुंडे,सचिव अनंत बारटक्के,संघटक केदार खराडे,प्रसिद्धी प्रमुख वैभव बारटक्के,सदस्य:- पवन तोतला,अथर्वे मुंडे,सिद्धांत लोखंडे,सर्वेश राजमाने,अक्षय खराडे,अभिजित रांजणकर,अथर्व आगलावे तसेच मार्गदर्शक राजाभाऊ लोखंडे,विशाल राजमाने,दत्ताभाऊ लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश