सोलापूर – All India Council For Robotics & Automation दिल्ली यांच्या मार्फत संगमेश्वर महाविदयालयाचे संस्थापक अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतिनिमित्त संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांच्या हस्ते स्कील सेंटर चे उदघाटन इलेक्ट्रॉनिक्स विभागात करण्यात आले. AICRA ही एक केंद्रशासनाची रोबोटीक संदर्भात सर्व भारतातील शाळा,महाविदयालयामध्ये स्कील कोर्सेस राबवणारी संस्था आहे. तसेच या AICRA संस्थेमार्फत Suvi -Instrument होडगी रोड यांना रोबोटीक ॲन्ड ॲटोमेशन प्रशिक्षण देण्याकरीता सोलापूर जिल्हयासाठी प्रतिनिधी म्हणून नेमले आहे. या प्रसंगी बोलताना Suvi Instrument कंपनीचे प्रमुख डॉ.एस.एम. तोडकरी यांनी रोबोटीक, AI व डेटा सायन्स क्षेत्रातील महत्व पटवून दिले. सध्या 5G इंटरनेट मुळे प्रचंड माहिती येत आहे व ती गोळा करुन त्यातून उपयुक्त माहिती काढता येते. आपण जेंव्हा ई-कॉर्मस साईट वर माहिती हुडकतो तेंव्हा आपोआप त्या वस्तू तयार करणाऱ्या कंपनीच्या जाहिरात व फोन येतात. तर हा एक डेटा सायन्स व AI चा भाग आहे असे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे सचिव धर्मराज काडादी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले बंगलोर सारख्या मोठया शहरात घरातील कामे करण्याकरीता रोबोट सारख्या मशिनचा वापर करण्यात येतो व ड्रोण च्या साहयाने शेती सुध्दा करण्यात येत आहे. तरी विदयार्थ्यांनी अशा मशिन मध्ये नविन तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन इस्ट्रंयूमेंट बनवावीत असे सांगितले. या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य व इलेक्ट्रॉनिक्स चे विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. देसाई म्हणाले की विदयार्थ्यांनी या स्कील सेंटर चा उपयोग करुन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळवावी. यावेळी शैक्षणिक सल्लागार विभागाचे डॉ दर्गोपाटील,संगमेश्वर महाविदयालयाचे उप प्राचार्य प्रसाद कुंटे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ.शुभांगी साळुंके, इलेक्ट्रॉनिक्स ज्युनिअर विभाग प्रमुख सौ.एस.पी. कुलकर्णी, Suvi Instrument चे डॉ.पी. एम.गव्हाणे, डॉ.वैभव बच्चूवार,अमित जगधने तसेच महाविदयालयाचे शिक्षकवर्ग व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पुष्पांजली म्हेत्री यांनी केले, पाहूण्यांचे स्वागत डॉ.संगिता जोगदे यांनी केले व आभार संगमेश्वर महाविदयालयाचे उप प्राचार्य प्रसाद कुंटे यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले