August 8, 2025

कळंब-धाराशिव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा संपन्न

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) एम,आय,डी,सी,डिकसळ येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला.या बैठकीस तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाअध्यक्ष संताजी चालुक्य,नितीनजी काळे,दत्तभाऊ कुलकर्णी,राजसिंह राजेनिंबाळकर,जि.प.माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे,भाजपा तालुकाध्यक्ष अध्यक्ष अजित (दादा) पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांचा देखील मान्यवरांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश घेण्यात आला. या कार्यकर्ता मेळाव्यासाठी तालुक्यातील तसेच विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

error: Content is protected !!