August 8, 2025

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवकाध्यक्ष विकास कदम यांचा भाजपात प्रवेश

  • कळंब (महेश फाटक ) –
    राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय जनता पक्षात तुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजिसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला.यावेळी जिल्हाध्यक्ष संताजी पाटील चालुक्य,नितिन काळे, प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित कव्हेकर,नेताजी पाटील,दत्ताभाऊ कुलकर्णी, तालुकाध्यक्ष अजित (दादा) पिंगळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर व इतर पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
    या निवडीबद्दल भाजपा पदाधिकारी,समाज बांधव, मित्रपरिवार यांनी विकास कदम यांचे स्वागत केले.विकास कदम यांच्या प्रवेशामुळे कळंब शहरासह जिल्ह्यात येत्या काळात भाजपाला चर्मकार समाजाची साथ मोठ्या प्रमाणात मिळेल अशी चर्चा या प्रवेशातून दिसून आली. गेली अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे विकास कदम यांनी राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा युवकाध्यक्ष म्हणून नुकतीच जबाबदारी स्वीकारली होती . गेल्या अनेक वर्षात विकास कदम यांनी चर्मकार समाजाचे प्रश्न सोडवले व कळंब शहरात श्री.संत रविदास महाराज मंदिर उभारले. त्याचप्रमाणे चर्मकार समाजाचा जिल्हा मेळावा व समाजामध्ये विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विवीध कार्यक्रम त्यांनी मागच्या काही काळात घेतले. सध्या महासंघाचे मराठवाडा युवकाध्यक्ष, इंद्रायणी न्युजचे संपादक, मराठवाडा नेता या दैनिकाचे कळंब तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय राजर्षी शाहू महाराज समाजरत्न पुरस्कार २०२२ देऊनही त्यांना गौरवण्यात आले होते.
error: Content is protected !!