August 8, 2025

धाराशिव जिल्हा भा.ज.पा. उपाध्यक्षपदी पुन्हा संजय घोगरे यांची नियुक्ती

  • कळंब (धनंजय घोगरे) – शुक्रवारी कळंब येथे झालेल्या भा.ज.पा कार्यकर्त्यांच्या बैठकीत संजय घोगरे यांची पुन्हा धाराशिव जिल्हा भा.ज.पा. उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्तीचे पत्र आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या व जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या हस्ते देण्यात आले.
    अधिक वृत असे की, गेल्या महिन्यात भा.ज.पा जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली होती मात्र त्यात संजय घोगरे यांची वर्णी कोणत्याच पदावर लागली नव्हती मात्र शुक्रवारी भा.ज.पा तालुका कार्यकर्त्यांची बैठक डिकसळ येथे आमदार राणा जगजीत सिंह पाटील,जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर काहींचे पक्ष प्रवेश हि झाले त्यानंतर संजय घोगरे यांची पुन्हा भा.ज.पा . धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील व धाराशिव जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य,कळंब तालुका अध्यक्ष अजित पिंगळे व माजी जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्या सह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत घोगरे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यामुळे सर्वत्र घोगरे यांच्या नियुक्तीचे स्वागत करण्यात येत आहे.
error: Content is protected !!