August 8, 2025

जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या हेरियंट j.N1 चा पहिला रुग्ण

धाराशिव/जयनारायण दरक – जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट j.N1 ने धुमाकूळ घातला आहे. आता महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात J.N1चा पहिला रुग्ण आढळला आहे. तुळजापूर तालुक्यात हा रुग्ण आढळला आहे. सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे तो रुग्ण शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. त्यावेळी अँटिजन चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहे. या रुग्णाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. आजपासूनच संशयित लोकांच्या चाचणी घेण्यास सुरू केल्या आहे.
धाराशिव जिल्ह्यात आढळला कोविड चा jn1चा पहिला रुग्ण आढळून आला आहे, हा रुग्ण तुळजापूर तालुक्यात आढळला असून त्याला सर्दी खोकल्या चा त्रास जास्त वाटू लागल्याने तो शासकीय रुग्णालयात तपासणी साठी गेला असता त्याची अँटीजन टेस्ट केली असता त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णांच्या संपर्कात जे व्यक्ती आले आहेत त्यांची देखील तपासणी केली असून इतर कुणाचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले नाही. हा रुग्ण एक दिवस लोहारा तालुक्यात देखील जाऊन आला असल्याने प्रशासन त्याही तालुक्यात संपर्कात आलेल्या लोकांचे टेस्ट करत आहे. दरम्यान हा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिल्या असून नागरिकांनी ही काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे
दरम्यान, भारतात केवळ कोरोनाच वाढत चालला आहे असे नाही, तर त्याच्या व्हेरिएंट JN.1 ने देखील हाहाकार माजवलाय. गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 529 नवीन रुग्ण आढळेय. सध्या उपचार सुरु असलेल्या रूग्णांची संख्या 4,093 एवढी नोंदवली गेलीये. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, या दरम्यान देशात कोरोना विषाणूमुळे 5 जणांचा मृत्यू झालाय.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे कर्नाटकात दोन आणि गुजरातमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झालाय. नंतर महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे मृत्यूची दोन प्रकरणे समोर आली. महाराष्ट्रात गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच कोरोनामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
महाराष्ट्रात 2 जणांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये देखील कोरोना विषाणूचा विळखा हा झपाट्याने होऊ लागला आहे. येथे बुधवारी 87 नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. कारण मंगळवारी कोविडची 37 प्रकरणे नोंदवण्यात आली. त्याच वेळी, जर आपण कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविषयी JN.1 बद्दल बोललो, तर देशात आतापर्यंत 110 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. बुधवारी प्रथमच, देशाची राजधानी दिल्लीत कोविड व्हेरिएंट JN.1 चे पहिले प्रकरण नोंदवले गेले.

error: Content is protected !!