August 8, 2025

प्राचार्य जयचंद कुपकर यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने …

  • सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. गेली ३१ वर्षे ते रणसम्राट क्रीडा मंडळ संचलित संस्थेतील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे भूगोल या विषयाचे अध्यापन करत आहेत.
    बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी कौशल्या व ज्ञानोबा कुपकर यांच्या पोटी जन्मलेल्या प्रा.जयचंद कुपकर यांनी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत चे शिक्षण सुर्डी येथील जि.प.शाळेत घेऊन त्यांनी पाचवी ते नववी पर्यंत चे शिक्षण विद्याभवन हायस्कूल कळंब येथे पूर्ण केले.दहावीत असताना लातूरच्या केशवराज विद्यालयात प्रवेश घेतला व पुढे अकरावी ते एम‌.ए.(भूगोल)चे शिक्षण शाहू काॅलेज लातूर येथे घेतले. तर B.Ed हे सुशिला देवी अध्यापक महाविद्यालय लातूर येथे घेतले.ITI चा डिप्लोमा करून त्यांनी औरंगाबाद येथील बजाज कंपनीत २७ दिवसांची नोकरी केली.त्यानंतर त्यांना रणसम्राट क्रीडा मंडळाचे अध्यक्ष कै.अरुणराव शेळके सर व प्राचार्य पी.एन.भवर सर यांनी दि.१६/६/१९९२ रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे भूगोल या विषयाचे अध्यापन करण्यासाठी रूजू करून घेतले.११वी व १२ वी भूगोल विषयाच्या सोबत त्यांनी शारीरिक शिक्षण महाविद्यालय कळंब येथे भूगोल विषयाचे मेथड मास्टर म्हणून अध्यापन केले.
    दरम्यान धारूर येथील महादेव जाधव यांची कन्या सौ.जयश्री हिच्या सोबत ३० मे १९९६ रोजी धारूर येथे त्यांचा विवाह झाला.त्यांना चि.ओमकार (एम टेक केमिकल) व कु.मयुरी (बी.फार्म)हे दोन आपत्य आहेत.
    १९९२ साली रूजू झालेल्या श्री.कुपकर सरांनी भूगोल विषयाच्या अध्यापनाबरोबरच एच.एस.सी.बोर्ड लातूर विभागात परीक्षक,नियामक, मुख्य नियामक व परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून कार्य केले.त्यांनी केलेले कार्य व कामाचा अनुभव यावरून संस्थाचालकांनी त्यांच्यावर १ मे २०२१ रोजी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबच्या प्राचार्य पदाची जबाबदारी दिली.प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्व सहकारी प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्याशी
    अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन करून सहकार्य केले.
    माझे ते बी.पी.एड.चे भूगोल विषयाचे मेथड मास्टर असल्यामुळे आमचे गुरू शिष्याचे नाते कायम राहिले.आज आमच्या स्टाफ मधील श्री.गिरी सर, श्री.गोरे सर, श्री.तोडकर सर, श्री.मोरे सर व मी आमचे ते अगोदर मार्गदर्शक गुरू होते . त्यानंतर आम्ही त्यांचे सहकारी झालो.पण आज ३० डिसेंबर २०२३ ला आमचे प्रमुख होऊन ३१ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत याचा आम्हांला सार्थ अभिमान वाटतो.
    आमचे गुरूवर्य तथा प्राचार्य कुपकर सरांना भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
    परमेश्वरला माझी प्रार्थना आहे, निवृत्ती नंतरचे आपले आयुष्य आरोग्य,संपत्ती आणि आनंदाने भरलेले राहो.
    सेवानिवृत्तच्या आपणास लाख लाख शुभेच्छा सर.
  • 💐💐
    शब्दांकन – श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे
    पद-सहशिक्षक (स्काऊट-गाईड कॅप्टन)
    सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब जि.धाराशिव.
error: Content is protected !!