August 8, 2025

गोविंदपूर येथे मल्टीस्टेटच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

  • गोविंदपूर (अविनाश सावंत यांजकडून ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कार्यशील चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मोहा दिनदर्शिका चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.दिनदर्शिकाचे प्रकाशन ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, जिल्हा परिषद शाळा गोविंदपूर अशा विविध ठिकाणी प्रकाशन करण्यात आले.
    यावेळी सरपंच अशोक मस्के,उपसरपंच संतोष मुंडे,शाखा व्यवस्थापक सचिन कुंभार, रोखपाल अरविंद निपाणीकर, विजय कुमार मुंडे , मंगेश माळी, औदुंबर मुंडे ,किशोर खाडे, विठ्ठल सौदागर ,तसेच बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!