August 8, 2025

धार्मिक कार्यक्रमांनी संत काशीबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी

  • धाराशिव ( जयनारायण दरक ) तालुक्यातील बेंबळी येथे दि.२९ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संत श्री काशीबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
    संत काशीबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त बेंबळी येथील जागृत श्रीराम मंदिरात सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हभप कारभारी महाराज उमरेगव्हाणकर यांचे प्रवचन संपन्न झाले. प्रवचनातून त्यांनी श्री संत काशिबा महाराज यांच्या कार्याविषयी माहिती देऊन समाजाला अनमोल मार्गदर्शन केले. त्यानंतर दुपारी बारा वाजता गुलाल व फुलांची उधळन करून संत श्री काशीबा महाराज गुरव यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या धार्मिक कार्यक्रमास विविध समाज बांधवानी उपस्थित राहून हरिनामाचा गजर केला. कार्यक्रमाच्या समारोपानानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमा दरम्यान हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज गोसावी यांचा सकल गुरव समाजातर्फे सत्कार करण्यात आला. धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सकल गुरव समाजातील बांधवानी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!