August 9, 2025

कलेक्टर,एस.पी च्या हस्ते ज्येष्ठांचा होणार सन्मान…!

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – पिंपळगाव डोळा बहुजन अमृत महोत्सवी सोहळ्यात धाराशिव जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे व पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते पिंपळगाव (डोळा) येथील शंभर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे संयोजन समिती अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज आडसूळ यांनी माहिती दिली.
  • सा.साक्षी पावनज्योतचे अधिस्वीकृती धारक संपादक सुभाष द.घोडके यांच्या एकसष्टी निमित्त कळंब तालुक्यातील मौजे पिंपळगाव (डोळा ) येथील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या शंभर ज्येष्ठ नागरिकांचा अमृत महोत्सवी सोहळा दिनांक ९ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निमंत्रण देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात संपादक सुभाष द.घोडके, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेव (नाना) टेकाळे, संयोजन समिती अध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज आडसूळ,कार्याध्यक्ष बंडू आबा ताटे,सदस्य बालाजी खंडागळे, शिवशाहीर बंडू खराडे आदींचा समावेश होता.
error: Content is protected !!