कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पावर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गणित विभागाकडून गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी गणित दिन साजरा करण्यात आला. गणित दिनाच्या निमित्ताने शाळेमध्ये गणितोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. गणित उत्सवाच्या निमित्ताने प्रा.सूरज पाटील यांनी प्रेसेंटेशन द्वारे रामानुजन याच्या गणित विषयाच्या योगदानबद्दल व जीवनाबद्दल माहिती दिली. यावेळी डॉ.अशोकराव मोहेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना गणित विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.सुनिल पवार,उपप्रचार्य डॉ.हेमंत भगवान,प्रा.बालाजी राऊत,प्रा.किरण बारकुल,प्रा.अर्चना मुखेडकर,प्रा.महाजन, प्रा.सूरज पाटील सह कार्यक्रमास सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले