August 8, 2025

व्हॉइस ऑफ मीडियाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत मडके यांची निवड

कळंब(महेश फाटक ) – व्हॉइस ऑफ मीडिया कळंब तालुका दि.२५ डिसेंबर २०१३ रोजी एम.डी.लाईव्ह कळंब कार्यालयात दुपारी १ वाजता आयोजित केलेल्या आढावा बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष अमर चोंदे व धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे,कळंब तालुकाध्यक्ष रणजीत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पद अधिकारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली.
यामध्ये सर्व पदाधिकारी यांच्या बहुमताने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट मोहा येथील प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी,शिवप्रसाद बियाणी यांची कळंब तालुका व्हॉइस ऑफ मीडिया उपाध्यक्षपदी तर अविनाश सावंत यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडिया कळंब तालुका कार्याध्यक्ष रामरतन कांबळे,उपाध्यक्ष रामराजे जगताप,डिजिटल मीडिया कळंब तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे,कोषाध्यक्ष सतीश तवले,राजेश पुरी,दिपक माळी प्रसिद्धीप्रमुख समाधान जाधव,अशोक कुलकर्णी व इतर व्हाईस ऑफ मीडियाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व मार्गदर्शन करण्यात आले.

error: Content is protected !!