August 8, 2025

श्रीकांत मडके यांची धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींची स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने अहोरात्र परिश्रम घेणारे मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष हनुमंत (तात्या) मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को.ऑप लि.मोहा येथील प्रशासकीय अधिकारी श्रीकांत मडके यांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या संघटनात्मक बांधणीत महत्वपूर्ण भूमिका असलेल्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे यांच्या मार्गदर्शनात कळंब येथील २५ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली.
    या निवडीबद्दल पत्रकार श्रीकांत मडके यांचा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट क्रे.सो.लि.मोहा,शाखा कळंब येथे शाखा अधिकारी फुलचंद (अण्णा ) मडके शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे उप लप्राचार्य प्रा. सतीश लोमटे ,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार व अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन अधिकारी राहुल मडके,कर्मचारी योगेश मुळे,अनिकेत मडके ,तुषार साठे ,सोमनाथ कातमांडे , श्रद्धा खामसवाडीकर यांनी श्रीकांत मडके यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!