August 8, 2025

धम्म परिषदेच्या माध्यमातून लोक प्रबुद्धवादी बनावे – भिक्खू जुन्सई तेरासावा (जपान)

  • लातूर – बौद्ध धम्म हा प्रेम करुणा, दया,शांती यांचा निर्माता आहे. बौद्ध धम्म हा लोकशाहीचे संवर्धन करणारा आहे, धम्म परिषदेच्या माध्यमातून लोकप्रबुद्धवादी बनावे असे प्रतिपादन जपान येथील पू. भिक्खु जुन्सेई तेरासावा यावेळी केले.
    बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्यावतीने धम्ममय वातावरणात पू. भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व पू. भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ६ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उदघाट्न आज दि.२५ डिसेंबर २०२३ रोजी जपान येथील पू. भिक्खु जुन्सेई तेरासावा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
    तत्पूर्वी धम्म परिषदेच्या पहिल्या सत्रात सकाळी ठीक ०८:०० वा. धम्मध्वजारोहना नंतर पूजनीय भिक्खु संघाच्या नेतृत्वात हजारो उपासक / उपासिका यांच्या साक्षीने धम्म मिरवणूक पार पडली.
    धम्मपरिषदेच्या उदघाट्नानंतर पू. भिक्खु संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले.
    तद्नंतर परिषदेचे प्रमुख अतिथी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, प्रदीप रणपिसे, भारत आदमाने, भा. ई. नगराळे, जोगेंद्र कवाडे, आर. ई. सोनकांबळे, जि. के. डोंगरगावकर यांचे सत्कार समारंभ झाले.
    या प्रसंगी पू. भिक्खु महाविरो थेरो, पू. भिक्खु पय्याबोधी थेरो, पू. भिक्खु सुमेध नागसेन, पू. भिक्खु नागसेन बोधी, पू. भिक्खु पय्यावंस, पू. भिक्खु संघप्रिय, पू. भिक्खु रेवतबोधी, पू. भिक्खु धम्मसार, पू. भिक्खुनी श्रमाणेरी मेत्ता, पू भिक्खु बुध्दशील, डॉ. सुधाकर गुळवे, प्रा. कल्याण कांबळे, पृथ्वीराज शिरसाठ, मल्लिकार्जुन कराडखेलकर, जि.एस. साबळे, प्रा. यू. डी. गायकवाड, सतीश कांबळे, अन्तेश्वर थोटे, केशव कांबळे, बसवंतप्पा उबाळे, भीमराव चौधन्ते, शोभा सोनकांबळे, मंदाकिनी गोडबोले, शशिकला सुरवसे यांच्यासह हजारोच्या संख्येने उपासक-उपासिका उपस्थित होते व पूजनीय भिक्खु संघाची उपस्थिती होती.
    या प्रसंगी राज्य एस्सी., एस टि. कोरम, वकील मंडळ, महार बटालियनचे सेवानिवृत्त जवान यांचाही सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक पू. भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. देवदत्त सावंत यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उदय सोनवणे, अनिरुद्ध बनसोडे, सुनील बनसोडे, अविनाश आदमाने, बालाजी धायगुडे, सतीश मस्के, समाधान आचार्य, कमल गाडे, निर्मला थोटे, आशा चिकटे, सुजाता अजनिकर, अविनाश आदमाने, ज्योतीराम लामतुरे, विशाल वाहुळे, निलेश बनसोडे,पांडुरंग अंबुलगेकर, गौतम आदमाने, राहुल शाक्यमुनी, मिलिंद धावारे व सामूहिक महा बुद्ध वंदना अभिवादन कार्यक्रम सकाळी समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!