August 8, 2025

संत साहित्याने नैतिकतेची शिकवण दिली – प्रा.डॉ.संजय चौधरी

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी २५ ते २७ डिसेंबर रोजी गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे.
    या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.डॉ.संजय चौधरी (करमाळा) यांनी गुंफले.
    वारकरी संतांचा लढा लढण्याची गरज या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते डॉ. संजय चौधरी यांनी मत व्यक्त केले.
    व्यासपीठावर ट्रस्टचे डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ.सुनील पवार,रोटरीचे अध्यक्ष सुदर्शन नारकर ,सचिव साजीद चाऊस,प्रो.चेअरमन अरविंद शिंदे उपस्थित होते
    पुढे ते म्हणाले,” आज हजारो वर्षे होऊनही आपण गोंधळलेल्या अवस्थेत आहोत.आपली भौतिक प्रगती ही महत्वाची नसून नैतिक प्रगती महत्वाची आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबानी तर कळस तुकोबांनी चढविला. केवळ मोक्षाची गरज नाही. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही शिकवण देणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी पंजाबपर्यंत नेला.विद्येविना मती गेली याच्या आधी नीती महत्वाची असून ही समाजोपयोगी शिकवण संतांनी दिली आहे.वारकरी संप्रदायाच्या अगोदर महानुभाव पंथ, वारकरी पंथ आस्तित्वात आहे.गुरू- परंपरा तुकोबांनी मोडीस काढून अन्याय -अत्याचार, अनिष्ट ,चालीरीती, प्रथा आणि परंपरा यावर अभंगांमधून जाणीव करून दिली.जाती,धर्म,वर्णव्यवस्थेच्या,पोलादी चौकटीला भेदण्याचे काम करून संतांनी नैतिकतेची शिकवण दिले.”
    या व्याख्यानमालेचे आभार डॉ.साजिद चाऊस यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा.दादाराव गुंडरे यांनी करुन राष्ट्रगीताने सांगता झाली.
error: Content is protected !!