मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालकाचे लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोक्सो कायद्याविषयी माहिती देण्यासाठी कळंब येथील सरकारी वकील ॲड. अभय नारायण गवळी व ॲड.सचिन मारुती जाधवर (उपाध्यक्ष, कळंब वकिल असोसिएशन) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजनाने झाली.त्यानंतर पूनम मडके या विद्यार्थिनीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना ॲड. अभय गवळी यांनी गुड टच बॅड टच, पोक्सो कायद्याची व्याप्ती, गुन्ह्यांचे स्वरूप तसेच शिक्षेची तरतूद इ. विषयी सखोल माहिती दिली. त्यानंतर ॲड. सचिन जाधवर यांनी बाल लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याची निर्मिती, गरज व व्याप्ती विशद करताना काही उदाहरणे देऊन या कायद्याचे गांभीर्य उपस्थितांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य संजय जगताप यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून दूर राहून आपले उज्ज्वल भविष्य घडवून या सुंदर आयुष्याचा आनंद घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजिया सय्यद या विद्यार्थिनीने केले. तर आकांक्षा शेळके या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. शेवटी प्राची पाटील या विद्यार्थिनीने उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा सुनील साबळे, प्रा. राहुल भिसे, प्रा. नवनाथ करंजकर, संजय आडणे, संजय मडके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
कळंबच्या डॉ.संपदा रणदिवे यांना बीएएमएस पदवी;नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
विनोद कोल्हे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान
भारतीय संविधानावर आघात; बुधवारी संत महंतासह मौनव्रत