धाराशिव (जिमाका) – केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत जनजागृती करणारी विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यातील अनेक गावात जाऊन लोकांशी संवाद साधत आहे.यात्रेदरम्यान लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवत आहे.याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगतच्या गुळहळी या गावात ही यात्रा पोहोचली.गुळहळ्ळी गावचे सरपंच तानाजी बनछेरे,ग्रामसेवक सचिन राठोड,माजी सरपंच मीरा घोडके,उपसरपंच नवनाथ पटणे, सचिन घोडके,ग्रामपंचायत सदस्य कलिमा पटेल, ग्रामस्थ सुभाष घोडके दत्ता घोडके,ललिता घोडके, विष्णू घोडके,वाल्मीक पांढरेव दयाबाई गायकवाड यांनी या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
तुळजापूरचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी या यात्रेच्या स्वागतादरम्यान तुळजापूर तालुक्यात 71 गावात ही यात्रा पोहोचली असून गावागावात नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची जनजागृती या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत असून नागरिकांनी या यात्रेतील विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लाभार्थी सचिन घोडके यांनी आपल्याला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमातून मिळालेल्या मदतीमुळे आपला व्यवसाय सुलभ झाला आणि आपल्या संसाराला हातभार लागला त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले.शशिकला पटणे यांनी गावात पिण्याच्या पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचल्यामुळे गावातील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली.त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.राम काळे यांना मुद्रा लोनमधून केंद्र सरकारच्या मदतीचा लाभ झाला. त्यामुळे त्यांनीही केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेला धन्यवाद दिले.
गावातील कुंदन हळकुंडे या महिलेच्या दोन मुलींना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेतून मिळालेल्या लाभाचा त्यांनी फायदा घेत आपल्या मुलींच्या लग्नाची चिंता मिटल्याचे सांगून केंद्र सरकारबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लक्ष्मी घोडके आणि ललिता घोडके या महिलांना प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून गॅस मिळाल्यामुळे त्यांची लाकूडफाटा आणून चुलीवर स्वयंपाक होताना होणाऱ्या धुरापासून सुटका झाली यामुळे त्यांनी पंतप्रधानांच्या उज्वला गॅस योजनेचे कौतुक करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.सुरेखा पत्रे या उमेद कार्यकर्तीने गावातील महिला बचत गटातील अनेक महिलांना बचत गटामार्फत रोजगार सुरू करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानातून कर्ज मिळाल्यामुळे त्या महिला आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्याबद्दल केंद्र सरकारचे विशेष आभार मानले.
या गावात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची काटेकोर अंमलबजावणी झाल्याचे दिसून आले. घरोघरी उज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळालेले गॅस ज्यामुळे धुरमुक्त गाव ही संकल्पना या गावात शंभर टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले.
स्वच्छता अभियानाअंतर्गत शौचालय मिळाल्यामुळे स्वच्छ गाव ही संकल्पना येथे यशस्वी झाल्याचे दिसून आले.मुद्रा लोन योजनेतून अनेकांना या गावात झालेला लाभ तसेच किसान सन्मान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना,प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना तसेच गावात जलजीवन मिशन अंतर्गत घरोघरी पाण्याचे नळही पोहोचल्यामुळे गावकऱ्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आणि केंद्र सरकारचे आभार मानले.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक