कल्याण ( गुरुनाथ तिरपणकर)– गुहागर तालुक्यातील आबलोली गावच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व विकासकामांच्या योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘राजमाता जिजाऊ जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन (अँटी पायरेसी सेल),मुंबई या संस्थेच्या वतीने आयोजित भारत सन्मान पुरस्कार सोहळा कल्याण येथील के.एम.अग्रवाल कॉलेजच्या एसी ऑडिटोरियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.या सोहळ्यात प्रमुख पाहुण्या इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान तसेच अभिनेत्री व ए-स्टार टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संस्थापिका अश्विनी अमित चुरी यांच्या हस्ते सौ.नेटके यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. सौ.वैष्णवी नेटके यांनी आबलोली या ग्रामीण भागात विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवत गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास घेतला आहे. सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल राज्य व जिल्हा स्तरावर अनेक संस्थांनी घेतली आहे. सरपंच म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.त्यांच्या कार्यामुळे त्या पंचक्रोशीत एक प्रभावी व लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जातात. या पुरस्कार सोहळ्यास त्यांच्या कुटुंबीयांनीही उपस्थिती लावली होती.सौ.वैष्णवी नेटके यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
More Stories
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
क्रांतीसूर्य महात्मा जोतीबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवात साजरी
अभिनेत्री करुणा काथखडे यांजकडून मोफत पाणी वाटप