उमरगा– संप्रदायाच्या माध्यमातून सामाजिक बदलाची व्यापक चळवळ देशभर उभी राहावी, असे प्रतिपादन आकांक्षा चौगुले यांनी केले.मॉर्निंग वॉकच्या वतीने गजानन महाराज मंदिर,उमरगा येथे आयोजित भजन संध्या कार्यक्रमात सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील नामवंत गायक,वादक,गीतकार व संगीतप्रेमींना निमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमात सहभागी कलाकारांचा सत्कारही करण्यात आला.आपल्या भाषणात आकांक्षा चौगुले यांनी धर्म, संस्कृती आणि शिक्षण ही सातत्याने परिवर्तन पावत राहणारी प्रक्रिया असून ती निरंतर सुरू राहिल्यास समाज एकसंध राहू शकतो,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमात दयानंद पाटील, पांडुरंग सुरवसे,ॲड.इंगळे, श्रीमान भागवत फुकटे,प्रा.मुरली जाधव,सुनील माने,अनिरुद्ध बाबळसुरे,पंडित शिंदे,सोहम कुंभार व विजयकुमार कांबळे यांनी सुमधुर अभंग सादर करून वातावरण भक्तिमय केले.या भजन संध्येमुळे पंढरीचा पांडुरंग उमरग्यात अवतरल्याची अनुभूती उपस्थितांना मिळाली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन व सूत्रसंचालन भूमिपुत्र वाघ यांनी केले.बळी मामा सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आयोजनात इंजिनिअर बाबरे सर, माने गुरुजी, कुमार तळीखेडे, राम पतंगे तसेच गजानन महाराज मंदिर समितीच्या सर्व व्यवस्थापकांचा विशेष सहभाग होता. कार्यक्रमात गायन-वादन केलेल्या मान्यवरांना आकांक्षा चौगुले यांच्या हस्ते समाज विकास संस्थेच्या वतीने कवयित्री कै. सरूबाई डोके यांच्या ‘जातीवरील ओव्या’ तसेच भूमिपुत्र वाघ लिखित ‘आभाळमाया’ हा काव्यसंग्रह भेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज विकास संस्थेचे कार्यकर्ते अक्षय कामले यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन ॲड.इंगळे यांनी केले.
More Stories
पुरोगामी विचारांची नवी दिशा; समाज विकास संस्थेच्या पुढाकारातून पुनर्विवाह संपन्न
उमरग्यात शाक्यसम्राट राजा अशोक व कांशीराम यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा